‘हिंदु राष्ट्रा’ची राज्यघटना बनवण्यात येणार !

हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे.

भारताच्या दुरावस्थेवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच उपाय !

‘कुठे इंग्लंडहून आलेले मूठभर इंग्रज संपूर्ण भारतावर काही वर्षांतच राज्य करू लागले, तर कुठे स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांच्या काळात दुभंगलेल्या भारतावरही राज्य करता न येणारे शासनकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मुंबईत पेगासस प्रकरणावरून काँग्रेसच्या मोर्च्याच्या वेळी भाजपचे आंदोलन !

या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या वेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश !

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवडी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर २ फेब्रुवारीला सुनावणी करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत.

संजय राऊत यांच्या निकटवर्तियाला ईडीकडून अटक !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील पत्रा चाळ भूमी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे हा चिंताजनक विषय नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लाखोंचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत असतांना दारू अशा प्रकारे सहजपणे उपलब्ध करून देणे म्हणजे जनतेला दारू पिण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे, असेच जनतेला वाटते !

सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अंत्यसंस्कारांना उपस्थित रहाणार्‍या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल, तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी रहित केली आहे

ज्येष्ठ गायक मुकुंदराज गोडबोले यांचे निधन !

‘संगीत अलंकार’ ही पदवी संपादन केलेले ज्येष्ठ गायक पं. मुकुंदराज गोडबोले (वय ७७ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने १ फेब्रुवारी या दिवशी दुपारी निधन झाले.