मतदारराजा, सावध हो ! चेंडू आपल्या रिंगणात आला आहे !
गोव्यातील जनता सुशिक्षित, सुसंस्कृत, विवेकशील, धार्मिक आणि शांतीप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. आदर्श राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने इथे दिलेल्या आवश्यक घटकांचा ते नक्कीच विचार करतील, ही अपेक्षा ! या पार्श्वभूमीवर मतदारांना सावध आणि सतर्क करण्याचा अन् त्यांना त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !