पुणे येथे ‘एम्.बी.ए.’च्या बनावट पदवी आणि गुणपत्रिका देणार्‍या दोघांना अटक !

शैक्षणिक क्षेत्रातील वाढते घोटाळे नवीन पिढीला बरबाद करत आहेत, हे लक्षात घेऊन घोटाळा करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.  बनावट पदवी देऊन तरुणाईला बिघडवण्याचे काम करणारे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.

जागा खाली करण्यासाठी सिडकोने पाठवलेल्या नोटिसीमुळे आसूडगाव (जिल्हा रायगड) येथील गोशाळेतील २६० गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न !

हे गोवंशीय कसायांकडे जाऊ नयेत, यासाठी गोशाळा आणि सिडको यांनी समन्वयाने गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे, असे गोप्रेमींना वाटते.

मराठी भाषेच्या समृद्धतेची जाणीव ठेवून तिचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – अभिजित बांगर, महापालिका आयुक्त

जागतिक मराठी भाषादिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘मायबोली मराठी’ हे खुले सुलेखन प्रदर्शन आयोजित केले आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे मराठा आरक्षण प्रकरणी मुंबईत आमरण उपोषण चालू !

मराठा समाजाच्या आरक्षण आणि अन्य मागण्या यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू केले आहे. ‘आपला लढा हा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही, तर गरीब मराठा समाजासाठी आहे’, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सरकारला कोंडीत पकडणार ! – सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ३ मार्चपासून चालू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडण्याविषयी भाजपच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

युक्रेनला वाली कोण ?

राष्ट्रासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारा, मुत्सद्दी आणि मुख्य म्हणजे आपले मित्र अन् शत्रू कोण ? याची उत्तम जाण असणार्‍या नेत्याच्या हाती राष्ट्र सोपवणे का आवश्यक असते, हे अधोरेखित झाले. झेलेंस्की यांनी ज्यांना मित्र म्हटले, त्यांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली….

अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक करतांना ४ वाहने जप्त !

अक्कलकोट परिमंडळाअंतर्गत असलेल्या मैंदर्गी आणि वागदरी नियतक्षेत्रात अनुमतीविना वृक्षतोड करून त्याची अवैधरित्या वाहतूक करतांना लाकडांसह ४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

मिरज येथे २८ फेब्रुवारी या दिवशी विश्वशांतीसाठी १० लाख नामजपाचा संकल्प !

येणार्‍या भीषण आप्तकाळात तरून जाण्यासाठी आणि विश्वशांतीसाठी मिरज येथे २८ फेब्रुवारी, पहाटे ५ ते रात्री ७ वाजेपर्यंत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या सामूहिक नामजपाचे आयोजन केले आहे.

आंध्र प्रदेश के आत्मकूर पुलिस थाने पर धर्मांधों द्वारा आक्रमण में पुलिस हवालदार शेख अथाउल्लाह भी सहभागी !

सेक्युलर अब चुप क्यों हैं ?

निधर्मीवादी आता गप्प का ?

आंध्रप्रदेशातील आत्मकूर पोलीस ठाण्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात सहभागी झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य पोलीस हवालदार शेख अथाउल्लाह याला अटक केली. तो कर्तव्यावर असतांनाच त्याने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले.