अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सरकारला कोंडीत पकडणार ! – सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप

सुधीर मुनगंटीवार

मुंबई – भाजप कार्यकारिणीची बैठक २६ फेब्रुवारी या दिवशी प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ३ मार्चपासून चालू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडण्याविषयी भाजपच्या बैठकीत चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लढण्याविषयी रणनीती ठरली आहे. त्याचसमवेत अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे त्यागपत्र घेण्याविषयी बैठकीत चर्चा झाली आहे. अधिवेशनात नवाब मलिक यांचे त्यागपत्र घेण्यासाठी आवाज उठवला जाईल.