अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक करतांना ४ वाहने जप्त !

२ धर्मांधांसह अन्य आरोपी पोलिसांच्या कह्यात

झाडांची मोठ्या प्रमाणात तोडणी करण्यात येत असतांना पोलीस काय करत होते ?

प्रतिकात्मक छायाचित्र

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – अक्कलकोट परिमंडळाअंतर्गत असलेल्या मैंदर्गी आणि वागदरी नियतक्षेत्रात वनपाल अक्कलकोट, वनरक्षक वागदरी, वनरक्षक मैंदर्गी, वनरक्षक गंगाधर कणबस हे पहाणी करत असतांना अनुमतीविना वृक्षतोड करून त्याची अवैधरित्या वाहतूक करतांना लाकडांसह ४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

या लाकडांमध्ये लिंब, बाभळ, सुबाभळ या प्रजातीच्या लाकडांचा समावेश आहे. भारतीय वनअधिनियम १९९७ चे कलम ४१ आणि ४२ अन्वये संबंधित आरोपी अश्पाक रसूल मुल्ला, संजय बिरप्पा हालमत्ते, गुडुभाई सय्यद फुलारी, संतोष सिद्धू व्हनमाने यांना कह्यात घेण्यात आले आहे.