भारतात दंगलखोरांकडून हानी भरपाई वसूल करण्याला विरोध होतो, तर कॅनडामध्ये कोणत्याही योग्य प्रक्रियेविनाच गुन्हेगार ठरवले जाते! – विचारवंत ब्रह्म चेलानी

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका राज्यातील अधिकार्‍यांना सार्वजनिक संपत्तीची हानी करणार्‍या दंगलखोरांना नोटीस मागे घेण्यास भाग पाडले. दुसरीकडे कॅनडामध्ये शांततापूर्ण आंदोलनाला योग्य प्रक्रियेविनाच गुन्हेगार ठरवले जाते.

अबुझमाड (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या तरुणांची गावकर्‍यांकडून हकालपट्टी !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना योग्य साधना ठाऊक नसते आणि म्हणून त्यांची देवावरील श्रद्धा न्यून होते. अशांना ख्रिस्ती मिशनरी जाळ्यात ओढतात आणि त्यांचे धर्मांतर करतात, हे लक्षात घेता हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत !

एका दारूच्या बाटलीवर दुसरी विनामूल्य न दिल्याने दुकानावर दगडफेक !

राजकारण्यांनी जनतेला अनेक गोष्टी विनामूल्य देण्याची सवय लावल्याने जनता आता दारूही विनामूल्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यातून कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. याला आतापर्यंतचे सर्व राजकीय पक्ष उत्तरदायी आहेत !

अमेरिकेकडून मिळणार्‍या आर्थिक साहाय्याला नेपाळी जनतेचा विरोध

अमेरिका चीनचा शत्रू असल्याने चीनची फूस असल्यामुळे नेपाळकडून विरोध करण्यात येत आहे का ? याचा शोध अमेरिका घेेणार का ?

बुरखा महिलांच्या अपमानाचे प्रतीक ! – तस्लिमा नसरीन

बुरखा हे महिलांच्या अपमानाचे प्रतीक आहे. खरे सांगायचे, तर महिलांसाठी हे जितके अपमानास्पद आहे, त्याहूनही अधिक ते पुरुषांसाठी आहे.

हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील.

रत्नागिरी येथे संस्कृत सुभाषित पठण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्कृत भारतीच्या वतीने सत्कार !

कु. दिव्या आणि कु. देवश्री या दोघीही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. दिव्या म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला यश मिळाले.

पाणीपुरवठा योजनांसाठी नगरोत्थान निधीमधून निधी दिला जाईल !

दापोली आणि मंडणगड या दोन्ही शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहेत. या योजना राबवण्यासाठी दापोलीसाठी ५० कोटी रुपये, तर मंडणगडसाठी ३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

२७ फेब्रुवारी या दिवशी खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नोकरी मेळावा’

या मेळाव्याच्या माध्यमातून थेट नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध ! या मेळाव्यामध्ये इयत्ता ८ वीपासून पदवी, पदवीत्तर, अभियंता, आदी शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना मूळ कागदपत्रांसहीत या मेळाव्यात मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

काँग्रेसच्या नेत्याने २ दिवसांपूर्वीच ‘हिजाबला विरोध करणार्‍यांचे तुकडे तुकडे करू’ असे म्हटले होते आणि त्यानंतर ही हत्या होते, याची चौकशी झाली पाहिजे ! कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना हिंदुत्वनिष्ठांची हत्या होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !