आजपासून इच्छुकांना नोंदणीसाठी अर्ज मिळणार
खेड – महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून २७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी खेड नगरपालिकेच्या भव्य प्रांगणात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि रत्नागिरी परिसरातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून थेट नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. या मेळाव्यामध्ये इयत्ता ८ वीपासून पदवी, पदवीत्तर, अभियंता, आदी शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना मूळ कागदपत्रांसहीत या मेळाव्यात मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे. या मेळाव्यातील इच्छुक उमेदवारांना नोंदणी अर्ज २१ फेब्रुवारी २०२२ पासून देण्यात येणार आहेत.
या मेळाव्यामध्ये भारत पे, युरेका फोर्बस, आय.सी.आय.सी.आय.बँक, एच.डी.एफ्.सी. बँक, एस्. बँक, कोटक महिंद्रा, बिग बास्केट, हिंदुस्थान टाइम्स, रिलायन्स, सी.एम्.एस्. हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, सोडॅकसो, एल.आय.सी, बायजुस, बजाज फायनान्स, ज्युपिटर हॉस्पिटल, आदी नामांकित आस्थापनाचे ‘कॅम्पस इन्टरव्ह्यू’ घेण्यात येतील. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना तिथल्या तिथे नियुक्ती पत्र देण्यात येईल.
हा मेळावा कै. किशोरची कानडे क्रीडांगण नगरपरिषदेच्या मागील मैदानात होणार आहे. तरी उमेदवारांनी भालचंद्र रवींद्र उपाख्य नंदू साळवी ८०८७९८२८९९, प्रसाद शेट्ये ९०९६३३५६५२, मिलिंद उपाख्य दादू नांदगावकर ९१३०५३०५९४, जयेश गुहागरकर ९८६०६२६२२० आणि सिद्धेश साळवी ९५६१७८४६६० या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.