नवी देहली – बुरखा हे महिलांच्या अपमानाचे प्रतीक आहे. खरे सांगायचे, तर महिलांसाठी हे जितके अपमानास्पद आहे, त्याहूनही अधिक ते पुरुषांसाठी आहे. ‘पुरुष त्यांच्या लैंगिक आवेगांवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ आहेत’, हे बुरख्यामुळे अटळपणे सिद्ध केले आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.
The burqa is a symbol of insult to women. To be honest, more than how degrading it is for women it is even more so for men. Burqas prove irrevocably that men are incapable of controlling their sexual impulses. https://t.co/1c8OqeHf0j
— taslima nasreen (@taslimanasreen) February 20, 2022
तस्लिमा यांनी अन्य एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काही पुरोगामी मुसलमान म्हणतात, ‘कुराणमध्ये हिजाबचा उल्लेख नाही; म्हणून हिजाब घालणे आवश्यक नाही.’ तथापि कुराणात हिजाबचा उल्लेख असता, तरी आपण हिजाब घालावा का ? नाही. कुणीही सांगितले, तरीही आपण दुराचाराने वागू नये. कोणताही ग्रंथ आणि कोणतीही गोष्ट पवित्र नाही.