भारतात दंगलखोरांकडून हानी भरपाई वसूल करण्याला विरोध होतो, तर कॅनडामध्ये कोणत्याही योग्य प्रक्रियेविनाच गुन्हेगार ठरवले जाते! – विचारवंत ब्रह्म चेलानी

विचारवंत ब्रह्म चेलानी

नवी देहली – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका राज्यातील अधिकार्‍यांना सार्वजनिक संपत्तीची हानी करणार्‍या दंगलखोरांना नोटीस मागे घेण्यास भाग पाडले. दुसरीकडे कॅनडामध्ये शांततापूर्ण आंदोलनाला योग्य प्रक्रियेविनाच गुन्हेगार ठरवले जाते.  आंदोलकांची वैयक्तिक बँक खाती आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांवरही कारवाई केली जाते, असे ट्वीट पत्रकार आणि विचारवंत ब्रह्म चेलानी यांनी केले आहे.
A tale of two democracies:

उत्तरप्रदेशामध्ये सुधारित नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दंगल करणार्‍यांकडून हानी भरपाई वसूल करण्यासाठी राज्य सरकारने त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या सर्वोच्च न्यायालयाने मागे घेण्याचा आदेश दिला होता. त्याची तुलना ब्रह्म चेलानी यांनी कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या अनिवार्यतेच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाशी केली आहे.