एका दारूच्या बाटलीवर दुसरी विनामूल्य न दिल्याने दुकानावर दगडफेक !

  • राजकारण्यांनी जनतेला अनेक गोष्टी विनामूल्य देण्याची सवय लावल्याने जनता आता दारूही विनामूल्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यातून कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. याला आतापर्यंतचे सर्व राजकीय पक्ष उत्तरदायी आहेत ! – संपादक
  • जनतेला साधना शिकवली असती, तर अशी स्थिती निर्माण झाली नसती ! – संपादक

देहली – देहलीतील जगतपुरी येथे मद्याच्या दुकानात एका दारूच्या बाटली समवेत दुसरी बाटली विनामूल्य न दिल्याच्या रागातून काही लोकांनी दुकानावर दगडफेक केली. यात काही जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांना अटक केली आहे.