ग्रामपंचायतीने वीजदेयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे किल्ले सदाशिव गडावरील सदाशिव मंदिर अंधारात !

शिवभक्तांना अशी मागणी का करावी लागते ? ग्रामपंचायतीने शिवभक्तांची अडचण लक्षात घेऊन वीजदेयक लवकरात लवकर भरावे, ही अपेक्षा !

‘किल्ले राजगड उत्सवा’त ३५५ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन साजरा होणार !

पुणे महापालिका आणि ‘श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन !

वर्ष २०१९ मधील पात्र उमेदवारांनी केली सामूहिक आत्महत्या करण्यास अनुमती देण्याची मागणी !

पात्र उमेदवारांना अशी मागणी करावी लागणे, हे संतापजनक आहे. उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत न बघता रखडलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात.

ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि उद्योजक यांची हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी घेतली भेट !

जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री आणि उद्योजक यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी सनातन संस्थेच्या ज्ञानशक्ति प्रसार अभियानाच्या संदर्भात त्यांनी सर्वांना माहिती दिली.

निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीर सिंह यांचा नकार !

सेवाज्येष्ठतेनुसार सध्याचे पोलीस महासंचालक आपणास निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही. गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे निलंबनाचा आदेश देऊ शकतात, असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे.

भूमीचोर पाद्री !

एखाद्या धर्माचा धर्मगुरु जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल, तर तो इतरांना मार्गदर्शन काय करणार ? साथ्रैक यांच्या गुन्हेगारी कृत्यावर प्रकाश पडल्यावर चर्च गप्प आहे. याचा अर्थ ‘साथ्रैक यांनी केलेला गुन्ह्याला एका अर्थी चर्चचाही पाठिंबा आहे…

अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील ८ सहस्र एकर क्षेत्रातील द्राक्षबागांची हानी !

सततच्या हवामानाच्या पालटामुळे द्राक्ष, डाळींब, केळी, सीताफळ, पेरू यांसह अन्य फळबागा आणि भाजीपाल्याच्या शेतीची हानी होत आहे.

संपूर्ण देशात असे का होत नाही ?

आसाममधील मदरसे बंद करण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही आतापर्यंत अनुमाने ७०० मदरसे बंद केले आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिली.

आध्यात्मिक त्रासांवर हास्यास्पद आणि वरवरच्या उपाययोजना करणारी निधर्मी लोकशाहीतील प्रशासकीय व्यवस्था !

खरेतर अशी अपघातग्रस्त ठिकाणे सूक्ष्म-जगतातील वाईट शक्तींद्वारे (भूत-पिशाच आदींद्वारे) प्रभावित असतात. त्यामुळे त्या भागात किंवा विशिष्ट ठिकाणी अपघात होतात. यासाठी अशी ठिकाणे अध्यात्मातील जाणकारांना दाखवून…