निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीर सिंह यांचा नकार !

मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास नकार दिला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार सध्याचे पोलीस महासंचालक आपणास निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही. गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे निलंबनाचा आदेश देऊ शकतात, असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे. मनुकुमार श्रीवास्तव हे आजारी असल्याने सुट्टीवर आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. निलंबनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.