देवा, तुझ्या सुंदर दृष्टीत सामावून जाऊ दे ना रे ।

दीपावलीची मागत आहोत
आम्ही अनोखी ओवाळणी ।
त्या ओवाळणीची
कळू दे ना रे देवा, जगाला
तुझी करणी (कीर्ती) ।। १ ।।

पुष्पांजली पाटणकर

कृष्ण म्हणतो आम्हाला,
‘ठेवीन तुला हृदयात’ ।
आम्ही प्रसन्न हसून म्हणालो, ‘नको रे देवा, तुझ्या हृदयात’ ।। २ ।।

कृष्ण म्हणाला, ‘का बरे, आमचे हृदय तुला नाही आवडत ।
सर्व भक्तांचे आहे ते स्थान, भक्तांना ते नाही सोडवत’ ।। ३ ।।

आम्ही म्हणालो, ‘आम्हाला ठेव तू तुझ्या निळाईच्या दृष्टीत ।
सतत तुझ्या दृष्टीसमोर असू दे,
कळो आम्हाला तू आहेस सृष्टीत’ ।। ४ ।।

तुझ्या दृष्टीच्या कृपाप्रीतीत सदैव आम्हाला न्हाता येऊ दे ।
आमचे पत्र कसे वाचतोस, ते आम्हाला पाहू दे ।। ५ ।।

तुझ्या नयनांच्या जलबिंदूत असेल आमची प्रीती ।
जगाला मात्र न कळे, तुझ्या कृपेची न्यारी रीत ।। ६ ।।

तुझ्या दृष्टीत राहून पाहू तुझे त्रिभुवन ।
तुझ्या दृष्टीनेच विश्व बनवू सारे आनंदवन ।। ७ ।।

तुझ्या दृष्टीत सतत असल्याने
तुझ्या दृष्टीने विश्व कळेल ।
देवाचे मन सदैव भक्ताकडे असते,
हे कळून जग तुजकडे वळेल ।। ८ ।।

हळूच कानात सांगते देवा,
भक्ताचा प्रीतीभाव सतत पहाशील ।
त्या प्रीतीभावात आनंदाने न्हाऊन जाशील ।। ९ ।।

तू सदैव असतोस प्रकाशरूप अन् आनंदरूप ।
कसे रे कळावे तुला भक्ताचे देवओढीचे स्वरूप ।। १० ।।

भक्ताच्या भक्तीची कळावी तुला ही कथा ।
देवदर्शनाच्या आसेची कळावी ना व्यथा ।। ११ ।।

उघड ना रे देवा तुझ्या पापण्यांची द्वारे ।
तुझ्या सुंदर दृष्टीत सामावून जाऊ दे ना रे ।। १२ ।।

तुझेच प्रकाशरूप घेऊन लावेन एक एक दीप ।
मानू नकोस आहोत दूर, असेन मी तुझ्या समीप ।। १३ ।।

– कृष्णपुष्प (पुष्पांजली (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)), बेळगाव (२९.१०.२०२०)