भूमीचोर पाद्री !

संपादकीय

ख्रिस्ती धर्मगुरूंची कुकृत्ये लपवणारी प्रसारमाध्यमे समाजाला दिशादर्शन काय करणार ?

प्रतिकात्मक छायाचित्र

 

तमिळनाडू राज्यातील कांचीपूरम् येथे सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेले चर्च उद्ध्वस्त करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. अवैध बांधकामे पाडण्याचा आदेश एखाद्या न्यायालयाने देण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही; मात्र हे प्रकरण विशेष आहे; कारण या सरकारी जागेत अनधिकृत चर्च बांधणारे सी. साथ्रैक हे पाद्री आहेत. प्रेम आणि शांती यांविषयी प्रवचने झोडणारे, येशूचे ‘शांतीदूत’ म्हणून मिरवणारे हे साथ्रैक नावाचे पाद्री नामचीन गुन्हेगाराप्रमाणे वागले आणि त्यांनी थेट सरकारी जागेवरच अतिक्रमण केले ! एवढेच नव्हे, तर हे अतिक्रमण जगासमोर येऊ नये; म्हणून त्यांनी स्थानिक तहसीलदार आणि अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्याशी साटेलोटे करून स्वतःचे दुष्कृत्य दाबण्याचा प्रयत्न केला. पांढरा झगा घालून वावरणार्‍या या पाद्र्यांची प्रतिमा जगभरात डागाळली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे, मुलांचे लैंगिक शोषण, अनाचार, हत्या करणे आदी विविध कृत्ये जगभरातील अनेक पाद्र्यांनी केली आहेत. त्यामुळे ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांना वारंवार क्षमायाचना करावी लागत आहे. साथ्रैक यांनी केलेल्या अतिक्रमणावरून ‘पाद्री हे ‘भूमीचोर’ही असू असतात’, हे पुढे आले. बहुतांश पाद्र्यांची प्रतिमा जगभरात डागाळली असली, तरी भारतीय चित्रपटसृष्टीत मात्र पाद्र्याचे पात्र रंगवतांना दिग्दर्शकांचे पाद्रीप्रेम उतू जाते. विविध चित्रपटांमध्ये त्यांना नेहमीच ‘प्रेमळ’ आणि ‘इतरांविषयी करुणा असणारे’ असेच रंगवले जाते. असो. येथे कळीचे सूत्र म्हणजे एका धर्मगुरूने असे कुकृत्य केले असतांना ती प्रसारमाध्यमांना ‘ब्रेकिंग न्यूज’ का वाटली नाही ? साथ्रैक यांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. पाद्री अतिक्रमण करत असतांना गावकर्‍यांनी त्यांना विरोध केला; मात्र हा विरोध मोडून काढण्यासाठी साथ्रैक यांनी प्रशासनातील भ्रष्टाचार्‍यांना हाताशी धरले. ख्रिस्त्यांना त्यांनी केलेल्या चुका आणि गुन्हे यांची स्वीकृती देता यावी, यासाठी चर्चमध्ये ‘कन्फेसमेंट’ (स्वीकृती) कक्ष असतो. साथ्रैक यांनी केलेला गुन्ह्याची स्वीकृती ते कुणासमोर देणार ? महत्त्वाचे म्हणजे सरकारी जागेवर अतिक्रमण करून चर्च बांधत असतांना ख्रिस्त्यांच्या धार्मिक संस्था किंवा ‘चर्च’ काय करत होते ? कि चर्चला असे अतिक्रमण करून धार्मिक केंद्र बांधणे मान्य होते ? न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. हे चर्च पाडले जाईल, तसेच गैरकारभार करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाईही केली जाईल; मात्र साथ्रैक यांनी केलेल्या गुन्ह्याचे काय ? त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे.

हिंदूंनी उभारलेला लढा !

या प्रकरणाचा निकाल देतांना न्यायालयाने केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. ‘एखादे अतिक्रमण किंवा धार्मिक संघटनांनी केलेले अवैध बांधकाम आढळून आल्यास जिल्हाधिकार्‍यांनी कायदेशीर कारवाई करावी’, असे न्यायालयाने सांगण्याची आवश्यकता नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे. ‘अतिक्रमण हटवा’, ‘अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा’, असे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारी जागेवर अतिक्रमण करण्याचे पाद्र्याचे धारिष्ट्य का झाले ? याला प्रशासनातील तत्त्वहीन आणि भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी उत्तरदायी आहेत. ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या धार्मिक संघटनांनी हिंदूंच्या किंवा सरकारी जागांवर अतिक्रमण केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर झालेले अतिक्रमण हा विषय गंभीर आहे. साथ्रैक यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या सूत्रावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. सध्या मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर जाऊन भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती. औरंगजेबाच्या काळात श्रीकृष्णजन्मभूमीवर अतिक्रमण करून तेथे इदगाह मशीद बांधण्यात आली. ही भूमी परत मिळावी, यासाठी हिंदूंनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ६ डिसेंबरला या मशिदीत प्रवेश करून तेथे श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून जलाभिषेक करण्याचा हिंदु महासभेचा मानस होता; मात्र असे काही होण्याआधी प्रशासनाने थेट १४४ कलम लावून तेथील हिंदुत्वनिष्ठांना नजरकैदेत टाकले. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून हिंदुत्वनिष्ठांना रोखले गेले. प्रशासनाने त्याची प्रक्रिया पूर्ण केली; मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांचे काय ? कायदा हातात घेऊन एखादी कृती करण्याचे कुणी समर्थन करू शकत नाही; मात्र ‘जलाभिषेक’सारखी कृती हिंदूंना का करावीशी वाटते ?’, याचे उत्तरही शोधले पाहिजे. मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची हडपलेली अशी सहस्रो ठिकाणे आहेत. ही भूमी हिंदूंना कधी मिळणार ?

प्रशासनावर कारवाई हवी !

एखाद्या धर्माचा धर्मगुरु जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल, तर तो इतरांना मार्गदर्शन काय करणार ? साथ्रैक यांच्या गुन्हेगारी कृत्यावर प्रकाश पडल्यावर चर्च गप्प आहे. याचा अर्थ ‘साथ्रैक यांनी केलेला गुन्ह्याला एका अर्थी चर्चचाही पाठिंबा आहे’, असे समजायचे का ? तमिळनाडूसारख्या राज्यात हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्याचे षड्यंत्र आखले आहे. यासाठी गावोगावी प्रार्थनासभांचे आयोजन करणे, हिंदूंना विविध आमिषे दाखवणे असे प्रकार चर्चकडून केले जातात. कांचीपूरम् येथे चर्च बांधण्यासाठी सरकारी स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्याची वेळ साथ्रैक यांच्यावर का आली ? ‘त्यामागे धर्मांतराचाही दुष्ट हेतू होता का ?’, याची चौकशी होणे आवश्यक आहे. एम्. मुरुगेशन् यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यानंतर ख्रिस्ती धर्मगुरूचे खरे स्वरूप समोर आले. त्यांनी याचिका प्रविष्टच केली नसती तर ? आज प्रशासनात मुसलमान आणि ख्रिस्ती धार्जिणे घटक अस्तित्वात आहेत. त्याचा फटका हिंदूंना बसतो आहे. साथ्रैक प्रकरणात न्यायालयाने अशांना दणका दिला आहे. केवळ तमिळनाडूतीलच नव्हे, तर भारतभरातील प्रशासनातील भ्रष्टाचार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी आता सरकारने मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.