‘पहिलीपासून इंग्रजी’ म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण भाषाजड होण्यासह मातृभाषा मराठीसह अभिजात भाषांवरही शैक्षणिक संकट !
भाषाजड शिक्षणामुळे राष्ट्राच्या आधिभौतिक उत्कर्षास आवश्यक आणि पोषक असलेल्या विज्ञान, गणित इत्यादी महत्त्वाच्या विषयांच्या पर्याप्त अभ्यासास विद्यार्थी विन्मुख होण्याची शक्यता आहे. ही एक प्रकारे राष्ट्रीय हानीच आहे.