ठाणे – जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री आणि उद्योजक यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी सनातन संस्थेच्या ज्ञानशक्ति प्रसार अभियानाच्या संदर्भात त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेला प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.
१. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियानामध्ये योगदान देऊ’, असे सांगितले.
२. ठाणे येथील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ‘गड-किल्ले संवर्धनासाठी एकत्रित येऊन गडावरील अतिक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.
३. भिवंडी येथील भाजपचे आमदार महेश चौघुले यांनी गड-किल्ल्यांवर होणार्या अतिक्रमणांच्या संदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ‘सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ शाळेतील मुलांपर्यंत पोचवण्यासाठी साहाय्य करू’, असे सांगितले.
४. भिवंडी येथील भाजपचे खासदार आणि केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला साहाय्य करू’, असे सांगितले.
५. कल्याण येथील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे येथील महापौर नरेश म्हस्के यांनी ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियानाला सहकार्य करू’, असे सांगितले.
६. ठाणे येथील उद्योजक श्री. नानजीभाई ठक्कर यांनी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचे कौतुक केले, तसेच ‘सनातन संस्थेला संपूर्णपणे सहकार्य करू’, असे सांगितले. ‘भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न केल्यास भगवंत कार्य करून घेणारच आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
मान्यवरांच्या भेटीच्या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. सागर चोपदार, श्री. सुनील कदम आणि सौ. सविता लेले उपस्थित होत्या.
धर्मकार्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन करणार ! – अधिवक्ता मनीष खंडागळे
भिवंडी येथील धर्मप्रेमी अधिवक्ता मनीष खंडागळे, ह.भ.प. हरड महाराज आणि अन्य धर्मप्रेमी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. ‘धर्मकार्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन करणार आहे’, असे अधिवक्ता खंडागळे यांनी या वेळी सांगितले.