जिल्ह्यातील अनेक व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक मनोज खाडये यांचे रत्नागिरी जिल्ह्यात ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या जनजागृतीविषयी ठिकठिकाणी ‘संपर्क अभियान’ !

रत्नागिरी, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून तो नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, इस्लामिक बँकेतून हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे, हे मोठे जागतिक षड्यंत्र आहे. अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी रत्नागिरी जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘संपर्क अभियाना’द्वारे जागृती केली. या अभियानात उद्योजक, व्यापारी, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी असे समाजातील सर्व प्रकारचे घटक सहभागी झाले होते. या अभियानात ‘अनेक उद्योजक आणि व्यापारी यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होऊ’, अशी सिद्धता दर्शवली. या संदर्भातील खेड, चिपळूण, सावर्डे आणि दापोली येथील बैठकांचा वृत्तांत येथे देत आहोत. या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर हेही उपस्थित होते.

श्री. मनोज खाडये

१. खेड

येथे १६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत श्री मुरलीमनोहर मंदिर येथे बैठक झाली. या बैठकीतील चर्चेत सर्वश्री संजय बुटाला, खेड व्यापारी संघटनेचे सेक्रेटरी श्री. अजयभाई धारिया, दीपक शेठ पाटणे, सचिन खेडेकर, विनय माळी यांनी सहभाग घेतला. या वेळी उद्योजक सर्वश्री विश्वास कदम, धीरज पटेल, प्रकाश पटेल, किशोर पटेल, मयुर पटेल, अनिकेत कानडे आदी उपस्थित होते.

खेड येथे देशविघातक ‘हलाल’ अर्थव्यवस्था रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे निवेदन पाठवण्याचा सर्वानुमते निर्णय

हा विषय अत्यंत गंभीर आहे. ‘हलाल’ अर्थव्यवस्थेची भयावहता लक्षात आली. हा विषय जनसामान्यांपर्यंत, घराघरात पोचवायला हवा. यापूर्वी देवीदेवतांच्या चित्रांचे फटाके अशा जनजागृतीमुळे बंद झाले, तसे हेही होईल. आम्ही एक हिंदु म्हणून अधिकाधिक सह्या घेऊन या संदर्भातील निवेदन केंद्र सरकारला पाठवू.

२. चिपळूण

चिपळूण येथे ही बैठक १८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत काणे हॉटेलवरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे पार पडली. या वेळी उद्योजक सर्वश्री अमोल जोगळेकर, जयंत नाईक, राजेंद्र वेस्वीकर, अजय देसाई, सुनील रेडीज, धर्मप्रेमी सर्वश्री निहार कोवळे, संजीव मोरे, संतोष चोगले, अथर्व देवळेकर, चिन्मय शिंदे, सुमित जांभुळकर यांसह २० जण उपस्थित होते.

मनोगत

श्री. अमोल बुटाला, उद्योजक, चिपळूण : यापूर्वी हा विषय ऐकल्यानंतर वस्तू खरेदी करतांना ‘हलाल शिक्का’ बघायला प्रारंभ केला. नंतर घरी, बिल्डिंग, मित्रपरिवार यांमध्ये सांगितले. अनेक व्यापार्‍यांमध्ये याविषयी जागृती केली.

अभिप्राय

अ. श्री. मंगेश राऊत, धर्मप्रेमी, परशुराम, चिपळूण. : हिंदु जनजागृती समिती जे कार्य करते ते सत्यावर आधारित आणि पुराव्यांसह करते. ‘हलाल’ संदर्भातील जागृती संघटितपणे करायला हवी.

आ. श्री. अनिरुद्ध शिंदे, धर्मप्रेमी, पेढांबे, चिपळूण : यापुढे वस्तू बघूनच खरेदी करीन. मित्रमंडळी, नातेवाइकांपर्यंत हा विषय पोचवेन.

३. दापोली

तालुक्यातील जालगाव येथे श्री प्रीतीवर्धन मंगल कार्यालयात व्यापारी आणि दुकानदार यांसाठी, गावतळे येथील श्री हनुमान मंदिरात धर्मप्रेमी, कीर्तनकार, सरपंच आणि ग्रामस्थ यांसाठी आणि हर्णे येथील श्री गिरिजा शंकर मंगल कार्यालय येथे व्यापारी, दुकानदार आणि महिला यांसाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयावरील बैठक पार पडली. या वेळी एकूण ६६ जण उपस्थित होते.

१. बैठकीत सहभागी व्यापार्‍यांनी याविषयी अशा प्रकारचा व्यापक स्तरावर अजून एक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.

२. प्रशासनाला याविषयी निवेदनही देण्यात येणार आहे.

३. यापुढे आम्ही प्रत्येक वस्तू हलाल शिक्का पाहून विकणार.

४. गावतळे येथील ग्रामस्थांनी सांगितले की, आम्ही ग्रामसभेचा ठराव करून पाठवणार, तसेच इतर गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना भेटून हा विषय सांगणार आणि त्यांनाही तसा ठराव पुढे पाठवण्यास सांगणार.

५. श्री गिरिजा शंकर मंगल कार्यालय, हर्णे येथे झालेल्या बैठकीत गावाच्या वतीने आणि व्यापार्‍यांच्या वतीने निवेदन देणार असल्याचे ठरवण्यात आले.

वैशिष्ट्ये

१. दैनिक ‘सकाळ’चे वार्ताहर असलेले श्री. अशोक चव्हाण यांचे दुकानही आहे. त्यांनी डोकलाम येथे आक्रमण झाल्यानंतर त्यांच्या दुकानात चिनी वस्तू ठेवण्यास बंद केले, तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेला खजूर स्वत:च्या दुकानात ठेवला नाही.

२. या वेळी रा.स्व. संघाचे श्री. मिलिंद जोशी उपस्थित होते. यापुढे संघाच्या प्रत्येक बैठकीत हा विषय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दापोली तालुक्यातील कात्रण येथील ह.भ.प. बाळकृष्ण बाईत यांना ‘युनिसेफ मार्केटिंग’च्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या वतीने उत्पादने वितरित करायची होती. ती उत्पादने ‘हलाल सर्टिफाइड’ होती. त्या आस्थापनात त्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी होती. चांगले पैसे ते कमावू शकत होते; परंतु तसे न करता त्यांनी तेथील काम करणे नाकारले.

‘हलाल’ मांस म्हणजे काय ?

हलाल लोगो

हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहाते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो.