सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनविभागाला आढळला पट्टेरी वाघ !

( प्रतिकात्मक चित्र )

सिंधुदुर्ग (जि.मा.का) – कुडाळ तालुक्यात काही दिवसांपूर्वी दुर्मिळ प्रजातीतील काळा बिबट्या सापडला होता. त्यानंतर आता सावंतवाडी वन विभागाने जंगलात लावलेल्या ‘कॅमेर्‍या’त पट्टेरी वाघ एका पाळीव प्राण्यांची शिकार करून ते खात असतांनाचे छायाचित्र टिपले गेले आहे. ‘वाघ’ राष्ट्रीय प्राणी असून त्याचे अस्तित्व असणे हे जैवविविधतेने संपन्न आणि परिपूर्ण जंगलाचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.

‘जिल्ह्यातील या वनवैभवाचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची वन्य प्राण्यांकडून शिकार झाल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. जेणेकरून शासनाच्या नियमांप्रमाणे हानीभरपाई देता येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा समृद्ध वनाचा वारसा जोपासण्यासाठी वन विभागासह सर्वांनी कटीबद्ध होऊया’, असे आवाहन सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस्.डी. नारनवर यांनी केले आहे.