जळगाव येथे युवा सेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘सायकल फेरी’ !

जळगाव – केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने होणार्‍या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ येथील युवा सेनेच्या वतीने ३१ ऑक्टोबर या दिवशी शहरातून दुपारी ‘सायकल फेरी’ काढण्यात आली. शेकडो युवा शिवसैनिक या फेरीत सहभागी झाले होते. इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. फेरीतील युवा शिवसैनिकांनी ‘हेच का अच्छे दिन ?’, असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली.

मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. आज महागाई अनियंत्रित असून सर्वसामान्य जनतेला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे, असे सांगत ‘हे मोदी सरकार भांडवलदारांच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे’, असा आरोप युवा शिवसैनिकांनी केला.