
जालना – जिल्ह्यातील शहागड येथे २८ ऑक्टोबर या दिवशी बुलढाणा अर्बन पतसंस्थेत बंदुकीचा धाक दाखवत ३ दरोडेखोरांनी रोख रक्कम आणि दागिने, असा ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. जालना, गोंदी आणि गेवराई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या प्रकरणातील २ दरोडेखोरांना २४ घंट्यांत पकडून अटक केली आहे. या दोन्ही दरोडेखोरांची यवतमाळ येथे मैत्री झाली होती. एका आरोपीवर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. आरोपींनी ८ मासांत ३ वेळा विविध ठिकाणी बँका लुटण्याचा प्रयत्न केला आहे. १ मासापूर्वी मुंबईतून चोरून आणलेल्या दुचाकीवरून येऊन त्यांनी शहागड येथे रेकी करून हा गुन्हा केला आहे. मुकिद उपाख्य मुश्ताक कासम (गेवराई) आणि संदीप सोळंके (माजलगाव), अशी दरोडेखोरांची नावे आहेत.
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद