२० लाख रुपयांची रोकड पळवली

बुलढाणा – चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला आहे. सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. या अधिकोषातून जवळपास २० लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवून नेली आहे. खिडकीचे गज वाकवून दरोडेखोर अधिकोषात शिरले आणि अधिकोषातील तिजोरी गॅस कटरने कापून त्यातील रक्कम पळवली.
पोलिसांकडून श्वानपथकाद्वारे दरोडेखोरांचा माग काढण्यात आला. श्वानाने अधिकोषाच्या बाजूच्या शेतापर्यंत माग काढला. तिथे दरोडेखोरांचे ‘हँडग्लोज’ आणि बॅटरी (विजेरी) मिळाली. सी.सी.टी.व्ही.त दरोडेखोरांचे चित्रीकरण झाल्याची शक्यता असून त्याचे चित्रण पडताळले जात आहे.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद