महामारीपासून बोध…!

कोरोना महामारीपासून बचाव होण्यासाठी लोकांनी लसीकरण करून घेतले आणि ‘आता आपण सुरक्षित आहोत आणि फिरायला मोकळे’, असे सर्वांना वाटत आहे; मात्र या वैश्विक संकटातून कुणी काय बोध घेतला ? यावरच स्वतःची सुरक्षा आणि पुढचे भविष्य ठरणार आहे. कोरोनाच्या आपत्तीतही धर्मांतर, जिहाद आणि साम्राज्यवादी मनोवृत्तीने काही जण धर्माच्या नावे षड्यंत्र आखत राहिले, कोणतेही भय मनात न ठेवता त्यांची कट-कारस्थाने चालूच राहिली. अशा धर्मांधांचा आपण प्रतिकार कसा करणार ? कोरोनासारखे महामारीचे संकट काही कालांतराने थांबेलही; पण या सुलतानी संकटापासून आपले रक्षण कसे होणार ? याचा हिंदूंनी काही विचार तरी केला आहे का ?

सामाजिक माध्यमांवर अनेक हिंदु तरुणांचे हिंदुत्वाने भारीत, जागृती करणार्‍या ‘पोस्ट’ (लिखाण) वाचल्या की, वाटते आता हिंदुत्व जागृत होत आहे; मात्र एवढे पुरेसे नाही. आज हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींवर सर्व सोपवून हिंदू धर्मांधांविरुद्ध लढा जिंकण्याचे दिवास्वप्न बघत आहेत; परंतु थोडे जागरूक राहून विचार करूया. धर्मासाठी सर्वस्व पणाला लावून लढण्याची जिद्द धर्मांधांमध्ये दिसते. त्या तुलनेत हिंदूंमध्ये ती इच्छाही जागृत झालेली नाही. सर्वांना जिहादी संकटाचे गांभीर्य वाटत आहे; पण जिथे तन, मन आणि धन यांच्या त्यागाचा प्रसंग येतो, तेव्हा आपले पुढे कसे होईल ? या विचाराने आपण माघार घेतो. येथे लक्षात ठेवले पाहिजे की, ईश्वराचे कार्य समजून धर्मशिक्षण घेऊन आपण धर्मपालन करत राहिलो, तर आपल्यातील धर्मतेज जागृत होईल. आपल्यात मुळात असणारी लढाऊ वृत्ती जागृत होईल. तेव्हाच या ‘जिहादी संकटा’चा आपण सामना करू शकणार आहोत. पूर्वी असुरही साधना करून देवतांकडून वरदान प्राप्त करायचे आणि बलशाली होऊन देवादिकांना त्रास द्यायचे. देवतांनाही असुरांना हरवण्यासाठी साधना करावी लागली. आपण तर मनुष्य आहोत. आज दुष्प्रवृत्तींशी वैध मार्गाने लढण्यासाठी आपल्याला पुष्कळ साधना करावी लागेल. ही साधना चांगली होण्यासाठी सध्याच्या कलियुगातही गुरुपरंपरा आपल्याला साधनेचे बळ पुरवत आहे. ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’ (धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.) हेच सत्य आहे आणि त्याचा अनेकांनी अनुभवसुद्धा घेतलेला आहे. आता ही विचारांच्या ठिणगीने जागृत झालेली संघटनाची मशाल पेटवूया आणि कृतीशील होऊया.

– सौ. कंचन शर्मा, अमरावती