लोकसंख्या नियंत्रण !

भाजप खासदारानी ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा हवा’ या मागणीसाठी संसदेत खासगी विधेयक आणण्याची नोटीस दिली आहे. भविष्यात भारतात अन्न, वस्त्र, निवारा, पाणी या गरजांसाठीही निश्चित यादवी माजू शकते. त्यामुळे सरकारनेही आता एक पाऊल पुढे टाकून लोकसंख्या नियंत्रण कायदा संमत करावा, ही अपेक्षा !

वीजदेयकावरून भाजपच्या माजी आमदारांचा महावितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न !

शेतीपंपाची वीजजोडणी महावितरण खंडित करत आहे. या विरोधात बाळासाहेब मुरकुटे यांनी दिलेल्या निवेदनांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन आंदोलन चालू असतांना गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.

सांगली जिल्ह्यातील बहुतांश बससेवा पूर्ववत् : कोल्हापूर जिल्ह्यातही आंदोलन स्थगित

जिल्ह्यातील ४ सहस्र कर्मचार्‍यांपैकी २ सहस्र कर्मचारी सेवेत परत आल्याने २३८ बसगाड्या चालू करण्यात आल्या आहेत.

निधन वार्ता : प्रभाकर केसकर (वय ८३ वर्षे)

सनातनच्या साधिका कल्पना केसकर यांचे यजमान आणि  श्री.गजानन प्रभाकर केसकर अन् सौ. रश्मी प्रवीण नाईक यांचे वडील प्रभाकर केसकर (वय ८३ वर्षे) यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

शेतकर्‍यांना दिवसा वीज द्या !

‘महावितरणने दिवसाचे ८ घंटे शेतकर्‍यांना वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा’, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

वाळूचा अवैध उपसा केल्याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा नोंद केला असून ४ जण कह्यात !

अवैधपणे वाळूची चोरी करणार्‍यांना त्वरित आणि कठोर शिक्षा केली तरच या घटना थांबतील.

पुणे येथे मिळकतकराची थकबाकी न भरल्याने इंग्रजी शाळेला टाळे ठोकले !

भरमसाठ शुल्कवाढ करणे, थकबाकी न भरणे असा मनमानी कारभार करणार्‍या शाळा त्वरित बंद करायला हव्यात. स्वतःच्या आर्थिक तुंबड्या भरण्यासाठी संस्थाचालकांनी शाळा काढण्याचे पेव फुटले आहे, त्यास काही प्रमाणात आळा बसेल

हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांकडून पैशांची मागणी !

असे पोलीस पोलीस विभागाला कलंकच आहेत. अशांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

मथुरा आणि काशी येथील मंदिरे मुक्त करण्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यावा !

हिंदु महासभेने येत्या ६ डिसेंबरला मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीत जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करून तिला अभिषेक करण्याची घोषणा केल्याने प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे.

हिंदु समाज झोपला आहे का ?

भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे. भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?