हमीभाव घेतल्याविना शांत बसणार नाही ! – शेतकरी नेत्यांची भूमिका

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने आझाद मैदान येथे ‘किसान-मजदूर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी शेतकरी नेत्यांसह शेतकरी, शेतमजूर यांनी शेतमालाला हमीभाव घेतल्याविना शांत बसणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

जिल्ह्यातील अनेक व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक मनोज खाडये यांचे रत्नागिरी जिल्ह्यात ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या जनजागृतीविषयी ठिकठिकाणी ‘संपर्क अभियान’ !

नाशिक येथील ३ हत्यांच्या घटनांच्या निषेधार्थ सातपूर पोलीस ठाण्यासमोर भाजप पदाधिकार्‍यांचे ठिय्या आंदोलन !

युनियनच्या वादातील आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून जिल्ह्यातील सातपूर येथे भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची नुकतीच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.

नाशिक पोलिसांवर राजकीय दबाव असून विधिमंडळात आवाज उठवणार ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. त्यांनी मृत अमोल इघे यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.

श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे हडपसर (पुणे) येथे उत्साहात स्वागत !

‘श्री हरि विठ्ठल’ नामघोषात पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. या पालखीसमवेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहेत.

विभक्त पत्नीला तातडीने देखभाल खर्च देण्याचा पोलीस आयुक्तांना आदेश !

विभक्त झालेल्या पत्नीच्या देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना दिले आहेत.

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी (जिल्हा पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमीला त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

सत्संग आणि सेवा यांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन राष्ट्र-धर्माचे कार्य करायला हवे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कळंबोली येथील युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपास्थिती लाभली.

पुढील पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याची मागणी !

नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होणे अपेक्षित आहे. यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आहे…

समष्टी श्रीकृष्णभक्ती हवी !

देश स्वतंत्र झाला आहे; मात्र व्यवस्था पारतंत्र्याप्रमाणे ! हे पालटण्यासाठी मोठ्या पदावरील व्यक्तींनी आता त्यांची व्यक्तीगत उपासना करत कंबर कसणे आवश्यक आहे. ते सुधारले, तर व्यवस्था सुधारील, त्यामुळे जनता जनार्दन प्रसन्न झाला की, समष्टीतील श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळून त्यांची भक्ती लवकर फलद्रूप होईल, हेच खरे !