सांगली, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातील बहुतांश बससेवा पूर्ववत् होत आहेत. जिल्ह्यातील ४ सहस्र कर्मचार्यांपैकी २ सहस्र कर्मचारी सेवेत परत आल्याने २३८ बसगाड्या चालू करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातही बससेवा चालू करण्यात आली आहे. काही बसगाड्यांना दगडफेकीपासून रक्षण होण्यासाठी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या संपामुळे सांगली आगाराची सुमारे १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. कोल्हापूर येथेही ‘एस्.टी.’ कर्मचार्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.