हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज, बेळगाव आणि खानापूर येथे निवेदन
कोल्हापूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला, तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्या रझा अकादमीवर बंदी घाला, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन अव्वल कारकून शिवाजी भोसले यांनी स्वीकारले. या वेळी श्री. जनार्दन देसाई, श्री. संजीव चव्हाण, श्री. वामन बिलावर आणि सौ. सुधा बिलावर उपस्थित होत्या.
कर्नाटकात बेळगाव आणि खानापूर येथे निवेदन
१. बेळगाव (कर्नाटक) येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी एस्.एम्. पारगी यांना वरील निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. सदानंद मासेकर, कर्तव्य महिला मंडळाच्या सौ. अक्काताई सुतार आणि सौ. मिलन पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर यांसह अन्य उपस्थित होते.
२. खानापूर येथे तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी श्री. सुशांत वारगावडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संभाजी चव्हाण, श्री. हणमंत होनगेकर, तसेच सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.