सेवेत कायम करा ! – शारीरिक शिक्षकांची धरणे आंदोलनाद्वारे मागणी
राज्यातील विविध शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्या शारीरिक शिक्षकांनी (फिजिकल ट्रेनिंग टिचर) ‘सेवेत कायम करावे’, यासाठी पणजी येथील आझाद मैदानात धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.
राज्यातील विविध शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्या शारीरिक शिक्षकांनी (फिजिकल ट्रेनिंग टिचर) ‘सेवेत कायम करावे’, यासाठी पणजी येथील आझाद मैदानात धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.
‘कॉर्डेलिय क्रूझ’ वरील कारवाईच्या प्रकरणी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची २६ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे २७ ऑक्टोबरला गोव्यात आगमन झाले असून ते ४ दिवस गोव्यात वास्तव्य करणार आहेत. या दौर्यात त्यांच्या हस्ते संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या नवीन जागेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
भक्तांनी अर्पण केलेल्या मद्याची चोरी करणार्याला कोरगज्जा देवतांनी शिक्षा केली असल्याची चर्चा कोडगु जिल्ह्यातील सुंटिकोप्पाच्या केदकल गावात ऐकू येत आहे.
राज्यशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या घोषित केल्या आहेत. या कालावधीत शाळेत घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ वर्ग बंद रहातील.
ध्या भारताचे पाकशी विविध स्तरांवर छुपे युद्ध चालू आहे. भारत आणि पाकिस्तान यांमध्ये नुकत्याच झालेल्या ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. हा क्रिकेटचा सामना खिलाडू वृत्तीने खेळला गेलेला नव्हता, हे पाकिस्तानच्या नेत्यांनी सामन्यानंतर घेतलेल्या खुनशी भूमिकेतून उघड झाले.
लव्ह जिहादची दाहकता दाखवणार्या ‘कनव्हर्जन’ (धर्मांतर) या चित्रपटाला ‘सेन्सॉर बोर्डा’ने (केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने) अनुमती नाकारल्याचे वृत्त समोर आले. ‘यावर कुणाही मानवाधिकारवाले किंवा निधर्मीप्रेमी काहीही बोलणार नाहीत’, हे उघड आहे. आता हा लढा कायदेशीर पातळीवर आणि हिंदूंना संघटितपणे वैचारिक पातळीवर लढावा लागणार आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या (‘डिटेक्टिव्ह ब्रँच’च्या) असमाधानकारक कामगिरीमुळे ती शाखाच विसर्जन करण्याची नामुष्की ओढावली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळेच वरिष्ठांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार्या बंगल्यात चोरी होतेच कशी ? अशी पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांच्या घरांचे रक्षण काय करणार ?
मंदिराचे व्यवस्थापकच मंदिरात चोरी करतात, यातून हिंदूंचे किती प्रमाणात पतन झाले आहे, हे लक्षात येते. ही दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !