दौंड (जिल्हा पुणे) येथील दत्त मंदिरातील साहाय्यक व्यवस्थापकानेच दानपेटीतील पैसे चोरले !

मंदिराचे व्यवस्थापकच मंदिरात चोरी करतात, यातून हिंदूंचे किती प्रमाणात पतन झाले आहे, हे लक्षात येते. ही दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक 

यवत पोलीस ठाणे

दौंड (जिल्हा पुणे) – दौंड तालुक्यात असलेल्या देऊळगावगाडा येथील ‘श्री सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान बेट’ येथील दत्त मंदिरातील दानपेटीतील ४ सहस्र रुपये मंदिराच्या छगन चौधरी या साहाय्यक व्यवस्थापकाने चोरले आहेत. १७ सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबर या दिवसांच्या सीसीटीव्हीच्या चित्रणातून ही माहिती उघड झाली आहे. संस्थानचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे यांनी चौधरी यांना त्याविषयी विचारले असता त्यांनी चोरी केल्याची स्वीकृती दिली आहे. त्यानुसार शितोळे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.