कळंबोली (जिल्हा रायगड) येथील सुधागड विद्या संकुल शाळेला सनातन संस्थेचे ग्रंथ भेट !

सनातन संस्थेचे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत रामदास शेवाळे प्रतिष्ठानचा उपक्रम ! 

मी जन्माने हिंदु होतो आणि आताही हिंदुच आहे ! – समीर वानखेडे, विभागीय संचालक, अमली पदार्थविरोधी पथक

मी जन्माने हिंदु होतो आणि आताही हिंदु आहे, असे वक्तव्य अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे.

जावयाला वाचवण्यासाठी नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न !

समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा आरोप !

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील (मुंबई) नियोजित कार्यक्रम रहित !

हिंदु बांधवांनो, या यशासाठी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! कार्यक्रम रहित करण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी ‘असे कार्यक्रम पुन्हा अन्यत्र होणार नाहीत ना ?’ याविषयी समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी दक्ष रहावे !

४ राज्यांत २५ गुन्हे नोंद असलेल्या गुजरातच्या ‘हेल्मेट गँग’ला नगर पोलिसांनी पकडले !

गुजरातमधील आरोपी असलेल्या या टोळीला ‘हेल्मेट गँग’ म्हणून ओळखण्यात येते. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, बंगाल अशा ४ राज्यांत या टोळीविरुद्ध २५ गुन्हे नोंद आहेत.

सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथे अवैध पशूवधगृहावर पोलिसांची धाड

एका अवैध पशूवधगृहावर धाड टाकून पोलिसांनी गोवंशियांचे मांस, १ चारचाकी वाहन, असा एकूण ८ लाख ५० सहस्र रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई शहरातील ईदगाह परिसरातील अब्दुलशानगर येथे करण्यात आली.

नाशिक येथे ३ डिसेंबरपासून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार ! – छगन भुजबळ, पालकमंत्री

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर या दिवशी होणार आहे.

कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार

कोकणच्या शाश्‍वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसाय यांसह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचसमवेत कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज (भांडवल) उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने…

नवी मुंबईत पत्रकारांसाठी इंग्रजी भाषा कार्यशाळेचे आयोजन !

‘ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा शिकली, तरी मराठी भाषेचा दर्जा उच्चच असेल’, असा आशावाद मान्यवरांनी या वेळी व्यक्त केला.

मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी ३ सहस्र ७०० कोटींपैकी २ सहस्र ८३० कोटी रुपये मिळाले !

अतीवृष्टीमुळे मराठवाड्यात ४७ लाख ७४ सहस्र ४८९ शेतकर्‍यांची ३६ लाख ५२ सहस्र ८७२ हेक्टर शेतीची हानी झाली होती.