‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईचे प्रकरण
मुंबई – ‘कॉर्डेलिय क्रूझ’ वरील कारवाईच्या प्रकरणी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची २६ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली. या वेळी मलिक अमली पदार्थविरोधी पथकाच्या संशयास्पद कारवाईच्या प्रकरणी गुन्हा नोंदवून विशेष पोलीस पथकाद्वारे अन्वेषण करण्याची मागणी केली.
याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देतांना नवाब मलिक म्हणाले, ‘‘या प्रकरणात किरण गोसावी यांच्यासारखे लोक कसे पैसे घेतात ?, पंच फरार असतांना आरोपींना कशा प्रकारे वागणूक दिली जाते ? पंचांची कोर्या कागदावर स्वाक्षरी घेणे आदी सर्व प्रकारांची चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यास अन्वेषण पुढे जाईल. यामध्ये कुणाला सूडबुद्धीने अडकवण्याची आमची भूमिका नाही.’’