पणजी, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे २७ ऑक्टोबरला गोव्यात आगमन झाले असून ते ४ दिवस गोव्यात वास्तव्य करणार आहेत. या दौर्याच्या कालावधीत त्यांच्या हस्ते विर्नोडा, पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या नवीन जागेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबर २०२१ या दिवशी राजभवन येथील हिरवळीवर ते कलाकार आणि बुद्धीजीवी लोकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०२१ या दिवशी ते देहलीला जाण्यासाठी प्रस्थान करतील.