भोपाळ (मध्यप्रदेश) येथे हिंदु मुलासह जाणार्‍या मुसलमान मुलीला बलपूर्वक बुरखा काढण्यास भाग पाडणार्‍या धर्मांधांना अटक

भारतामध्ये हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलगी दिसल्यास धर्म संकटात येतो. याउलट मुसलमान मुलासमवेत हिंदु मुलगी दिसल्यास ती ‘धर्मनिरपेक्षता’ असते, हे लक्षात घ्या !

लालबाग (मुंबई) येथील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीला भीषण आग !

उंच इमारतीपर्यंत पोचणारी यंत्रणा अग्निशमनदलाकडे उपलब्ध नाही !

धाराशिव येथे दगडफेक करणार्‍या १५० धर्मांधांवर गुन्हे नोंद

शहरातील विजय चौकात प्रतिवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त भगवा झेंडा लावला जातो. त्यात ईद हा सण आल्याने मुसलमानांनीही या चौकात भगव्या झेंड्याच्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला. यावरून वाद निर्माण होऊन १९ ऑक्टोबरच्या रात्री ४०० हून अधिक धर्मांधांनी परिसरातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यासह वाहनांची तोडफोड केली.

आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर २ आठवड्यांत उत्तर द्या !

जुलै २०२० मध्ये तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अन्वेषण यंत्रणेने केलेले सर्व आरोप तेलतुंबडे यांनी फेटाळले आहेत.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील दस्तऐवज खराब झाल्याचा दावा !

‘संबंधित अधिका‍र्‍यांची माहिती उघड होऊ नये, यासाठीच ही कृती केली आहे’, असे लोकांच्या मनात आल्यास चुकीचे काय ? अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना वेळीच बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी !

केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री महाराष्ट्र

राज्यात महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांच्या मागे केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काही नेत्यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी चालू आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्वेषण यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे.

‘कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी निविदा न मागताच कंत्राट कसे दिले ?’, याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाकडून सरकारला निर्देश

‘कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी निविदा न मागताच कंत्राट कसे दिले ?’, यावर प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सरकारला दिले आहेत.

नवाब मलिक यांच्या विरोधात कायदेशीर मार्ग अवलंबणार ! – समीर वानखेडे, विभागीय संचालक, अमली पदार्थविरोधी पथक, महाराष्ट्र

मलिक वारंवार माझ्या कुटुंबातील महिलांना लक्ष्य करत आहेत, हे चुकीचे आहे. याविषयी मी लवकरच कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे, असे उत्तर अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना दिले.

आसगाव (भंडारा) येथील सेंट्रल बँकेत दीड कोटी रुपयांची अफरातफर !

जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आसगाव शाखेत दीड कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आली असून या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह ५ कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी प्रदीप पडोळे यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत वर्ष २०१८ पासून नियुक्ती करण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यात भरदिवसा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेवर दरोडा

या भागात अनेक वित्तीय संस्था आणि बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.