पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतवस्तीवर दरोडा टाकून दरोडेखोरांकडून २ महिलांवर बलात्कार !

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडोळी भागातील शेतवस्तीमध्ये ३ मासांपासून मध्यप्रदेशातील एक कुटुंब रहाण्यास आले होते. यात ३ पुरुष आणि ४ महिला आहेत. १९ ऑक्टोबरच्या रात्री ७-८ दरोडेखोरांनी या शेतवस्तीवर आक्रमण केले. दरोडेखोरांनी तेथील पुरुषांचे हात-पाय बांधून ठेवत २ महिलांवर बलात्कार केला.

वास्को मासळी मार्केटबाहेर पोलिसांचे संचलन (परेड) : बाजारातील व्यापारी आणि विक्रेते यांच्यामध्ये तणावाचे वातावरण

वास्को मासळी मार्केटबाहेरील फळ-भाजी विक्रेत्यांनी दुसर्‍या तात्पुरत्या ‘शेड’मध्ये स्थलांतर होण्यास नकार दर्शवल्याचे प्रकरण

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाविषयी नंदुरबारच्या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन !

याप्रसंगी ‘इस्कॉन’चे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख श्रीमान माधवशाम सुंदर दास, श्रीमान भद्रसेन दास, निखिल खलाने, धर्मप्रेमी धीरज चौधरी, जितेंद्र मराठे, हिंदु जनजागृती समितीचे प्रा.डॉ. सतीश बागुल आणि राहुल मराठे उपस्थित होते.

बेरोजगारीचे संकट !

बेरोजगारीच्या दुसर्‍या गटात उच्चशिक्षित आणि विशेषत: युवा वर्गाचा विचार करता येईल. मुळात कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वीही उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या भारतात अधिक आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.

नगर येथील महापालिकेच्या मुख्य लेखाधिकार्‍याला २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी अटक !

येथील महापालिकेत मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांना ठेकेदाराच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने २१ ऑक्टोबर या दिवशी अटक केली.

शिर्डी संस्थानच्या अधिकार्‍याकडून साईभक्त महिलांना भ्रमणभाषद्वारे अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार !

शिर्डीतील ‘साईबाबा संस्थान’च्या जनसंपर्क विभागातील एका अधिकार्‍याने काही महिला भक्तांना भ्रमणभाषद्वारे अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार आली आहे. आसाम आणि मुंबई येथील महिलांनी संस्थानकडे ही तक्रार केली आहे.

नाशिक येथे कांदा व्यापार्‍यांची घरे, कार्यालये आणि गोदामे येथे प्राप्तीकर विभागाच्या धाडी !

जिल्ह्यात पिंपळगाव बसवंतसह अन्यत्र कांदा व्यापार्‍यांची घरे, कार्यालये आणि गोदामे आदी २० ठिकाणी प्राप्तीकर विभागाने २१ ऑक्टोबर या दिवशी धाडी टाकल्या.

कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर चाकूने आक्रमण !

घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट परिसरात नुकतेच नारळ विकणार्‍या एका फेरीवाल्याने ठाणे महानगरपालिकेच्या पथकावर चाकूने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. फेरीवाल्याने ‘आधी बोटे छाटली होती, आता मानच छाटू’, अशी धमकी दिली.

आज पनवेल येथे सुप्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम !

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेल’च्या वतीने ‘संवादमाला पुष्प ३’ अंतर्गत प्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम शनिवार, २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात होणार आहे.