धाराशिव येथे दगडफेक करणार्‍या १५० धर्मांधांवर गुन्हे नोंद

  • महिला पोलीस कर्मचार्‍यांसह अन्य पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण

  • भगव्या झेंड्याच्या ठिकाणी हिरवा झेंडा लावण्यावरून झालेल्या वादाचे प्रकरण

लहानसहान कारणांवरून दगडफेक करणाऱ्या धर्मांधांना पोलीस वठणीवर केव्हा आणणार ? – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

धाराशिव – शहरातील विजय चौकात प्रतिवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त भगवा झेंडा लावला जातो. त्यात ईद हा सण आल्याने मुसलमानांनीही या चौकात भगव्या झेंड्याच्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला. यावरून वाद निर्माण होऊन १९ ऑक्टोबरच्या रात्री ४०० हून अधिक धर्मांधांनी परिसरातील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यासह वाहनांची तोडफोड केली. या ठिकाणी पोलीस आले असता महिला पोलीस कर्मचार्‍यांसह अन्य पोलीस कर्मचार्‍यांही मारहाण करण्यात आली. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी घायाळ झाले होते. या प्रकरणी बिलाल खलील शेख, बब्बु मुजावर, फय्याज शेख, असलम शेख, अकबर मुजावर, ईस्माईल शेख यांच्यासह १५० धर्मांधांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ‘धर्मांधांनी दगडफेक केल्यानंतर रस्त्यावर दगडांचा खच पडलेला दिसत होता. (धर्मांधांकडे अचानक एवढे दगड कुठून आले ? यातून ‘हे पूर्वनियोजित आक्रमण होते’, असे कुणाला वाटल्यास चूक काय ? हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी धर्मांध कोणते ना कोणते कारण शोधत असतात, असेच यातून दिसून येते. त्यामुळे हिंदूंनी संघटित रहाणेच आवश्यक आहे ! – संपादक) पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी येताच सर्व धर्मांध मशिदीमध्ये पळून गेले; मात्र त्यांना पकडण्यासाठी पोलीस मशिदीमध्ये न जाता ‘पायातील बूट काढण्यात वेळ जाईल’, या विचाराने माघारी परतले. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याने बंदोबस्तासाठी दंगल नियंत्रक पथक नियुक्त करण्यात आले होते.’