एल्गार परिषदेच्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश !
मुंबई – एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण यांतील आरोपी आनंद तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर २ आठवड्यांत उत्तर सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला दिले आहेत. ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी झालेली एल्गार परिषद आणि त्यानंतर उसळलेली दंगल यांमध्ये नक्षलवादी कारवाया घडवून आणण्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना अटक केली आहे. जुलै २०२० मध्ये तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अन्वेषण यंत्रणेने केलेले सर्व आरोप तेलतुंबडे यांनी फेटाळले आहेत.