भारतामध्ये हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलगी दिसल्यास धर्म संकटात येतो. याउलट मुसलमान मुलासमवेत हिंदु मुलगी दिसल्यास ती ‘धर्मनिरपेक्षता’ असते, हे लक्षात घ्या !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे धर्मांधाच्या जमावाने एका मुसलमान मुलीला बलपूर्वक बुरखा काढण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी शोएब आणि अब्दुल माजिद यांना अटक केली आहे.
१. यासंदर्भात एक चित्रफित सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होत आहे. यामध्ये एक युवक बुरखा घातलेल्या मुलीसमवेत दुचाकीवरून जात आहे आणि त्यांना थांबवून काही लोक बलपूर्वक मुलीला बुरखा काढण्यास सांगत आहेत.
२. एका हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलगी दुचाकीवर जात असल्याचे दिसल्यावर धर्मांधांच्या जमावाने तत्परतेने त्यांची गाडी थांबवली. ‘हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलीची मैत्री असल्यास इस्लामचा अपमान होईल’, अशी जमावाची धारणा होती.
३. ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर लोकांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये स्वत:हून लक्ष घालून २ धर्मांध तरुणांना अटक केली. (लोकांनी मागणी केल्यावर नको, तर स्वतःहून धर्मांधांवर कारवाई करणारे पोलीस हवेत ! – संपादक) पोलीस महानिरीक्षक इर्शाद वली यांनी सांगितले की, विनाकारण कुणावरही दबाव टाकता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.