जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील दस्तऐवज खराब झाल्याचा दावा !

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन ढगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर दस्तऐवज खराब झाल्याचे जाहीर !

‘संबंधित अधिका‍र्‍यांची माहिती उघड होऊ नये, यासाठीच ही कृती केली आहे’, असे लोकांच्या मनात आल्यास चुकीचे काय ? अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना वेळीच बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी ! – संपादक

येरवडा (पुणे) – मुसळधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे येरवड्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील पडताळणीचे दस्तऐवज, इतर अभिलेख, संगणक आदी साहित्य खराब झाल्याचा दावा कार्यालयाने केला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन ढगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर दस्तऐवज खराब झाल्याचे जाहीर केल्याने या प्रकरणातील संशय वाढला आहे. येरवडा परिसरात ९ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे समिती कार्यालयातील मागील बाजूची कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली. (पावसाने दस्तऐवज खराब झाले असतांना जात पडताळणी कार्यालयाने याविषयी १० दिवसांनंतर का सांगितले ? – संपादक)