विशाळगड विषयाच्या संदर्भात १६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे एकत्रित बैठक !

१९ मार्च या दिवशी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना कृती समितीने निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कोणतीच कृती न झाल्याने कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांची १३ सप्टेंबर या दिवशी भेट घेऊन ‘स्मरणपत्र’ सादर करण्यात आले.

विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार न केल्यास विनाश अटळ ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हवामानात सातत्याने होणारे पालट, ही धोक्याची घंटा आहे. विकास प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार न झाल्यास विनाश होऊ शकतो.

न्यायालयीन पर्याय शिल्लक असेपर्यंत अनिल देशमुख ‘ईडी’समोर उपस्थित रहाणार नाहीत ! – प्रवीण कुंटे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रवीण कुंटे पुढे म्हणाले की, १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते सार्वजनिकरित्या कुठेही दिसून आले नाहीत.

मोकाट गुरे उचलून गोशाळांच्या कह्यात देण्याचा गोवा शासनाचा निर्णय

रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात असतात अशी २० प्रमुख ठिकाणे (हॉटस्पॉट) प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली असून या जागांवरून गुरांना उचलून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

साकीनाका घटनेतील क्रूरकर्म्याला देहदंडाची शिक्षा द्या ! – छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपचे खासदार

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेचे दु:खही होते आणि खेदही वाटतो.

होमिओपॅथी उपचारपद्धतीला सर्वमान्यता मिळायला हवी ! – उज्ज्वल निकम, विशेष सरकारी अधिवक्ता

अ‍ॅलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरित परिणाम होतात; परंतु होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणतेही शस्त्रकर्म न करता किंवा इंजेक्शन न देता केवळ पांढ‍र्‍या गोळ्या प्रभावी ठरतात.

सोलापूरमधील चिंचगाव (टेकडी) येथील प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांचा देहत्याग !

जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचगाव (टेकडी) येथील प.पू. रामानंद सरस्वती महाराज (वय ९७ वर्षे) यांनी १३ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला. रात्री ७ वाजता त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर त्यांनी देहत्याग केला. १४ सप्टेंबर या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेणार्‍यांनी जिल्ह्यातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांचेही श्रेय घ्यावे ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ लागली आहे; मात्र सत्ताधार्‍यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.

‘बोगस शिक्षक भरती प्रकरणी’ जिल्हा परिषदेकडून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट; गुन्हा नोंद !

बोगस शिक्षक भरती होणेच गंभीर आणि चिंताजनक आहे. यामध्ये सहभागी असणार्‍यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे

खारेपाटण येथे दीड लाख रुपयांचा गुटखा पोलिसांच्या कह्यात

मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील पोलीस तपासणी नाक्यावर १३ सप्टेंबरला पोलिसांनी एका टेंपोची तपासणी केली. या वेळी पोलिसांना टेंपोत दीड लाख रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी गुटखा आणि वाहन कह्यात घेतले.