होमिओपॅथी उपचारपद्धतीला सर्वमान्यता मिळायला हवी ! – उज्ज्वल निकम, विशेष सरकारी अधिवक्ता

मिशन होमिओपॅथीतर्फे “होमिओपॅथीक कोविड हिरो” सन्मान सोहळा – मध्यभागी अधिवक्ता उज्ज्वल निकम

पुणे, १४ सप्टेंबर – ‘होमिओपॅथीने अनेक चमत्कार घडवल्याचे पाहिले आहे. ही उपचारपद्धती अनेक आजारांवर गुणकारी ठरली आहे. अ‍ॅलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरित परिणाम होतात; परंतु होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणतेही शस्त्रकर्म न करता किंवा इंजेक्शन न देता केवळ पांढ‍र्‍या गोळ्या प्रभावी ठरतात. त्यामुळे होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी केले. ते मिशन होमिओपॅथी आणि ‘आदित्य होमिओपॅथी हॉस्पिटल अँड हिलिंग सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. अमरसिंह निकम लिखित ‘अ होमिओपॅथी गाईड टू कोविड १९’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ‘होमिओपॅथिक कोविड हिरो’ या सन्मान सोहळ्यात बोलत होते.

या वेळी वैद्य अमरसिंह निकम म्हणाले, होमिओपॅथी ही सर्वसामान्यांना परवडणारी उपचारपद्धती आहे.