‘रावण लीला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना मानहानीची नोटीस; विनाअट क्षमा मागण्यास सांगितले !

चित्रपटात श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या !

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या सामूहिक नामजपामुळे जिज्ञासूंना आली चैतन्याची अनुभूती !

‘या नामजपामुळे पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवला’, असे अनेकांनी कळवले.

साकीनाका येथील महिलेवर अत्याचार प्रकरणाचा उलगडा

साकीनाका येथील बलात्कार प्रकरणातील महिला आणि आरोपी हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. तसेच त्यांच्यातील देवाण-घेवाणीच्या वादातून आरोपीने या महिलेवर अत्याचार करून अमानुषपणे त्यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे.

भारताच्या वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त फोंडा येथील क्रांती मैदानात भारतीय सेनेकडून आज कार्यक्रम

वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाच्या ५० व्या वर्धापनदिनी स्वर्णिम विजय वर्षाच्या (सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या) विजयाची ज्योत १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी फोंडा येथे पोचेल.

अकोले (नगर) येथील आदिवासी भागांतील ७६ गावांत ‘एक गाव, एक गणपति’ !

प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साहाय्य करणार्‍या अकोले (नगर) येथील भक्तांचे अभिनंदन ! सणांच्या वेळी प्रशासनाला साहाय्य करण्याच्या घटना हिंदूंच्या बाबतीतच ऐकायला मिळतात, हे लक्षात ठेवा.

रत्नागिरीतील मूर्तीकार आशिष संसारे यांनी ऑलिंपिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदक मिळवणारे नीरज चोप्रा यांच्या रूपातील श्री गणेशमूर्ती साकारून श्री गणेशाचे केले मानवीकरण !

श्री गणेशाची कृपा होण्यासाठी श्री गणेशमूर्ती चित्र-विचित्र आकारात नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार साकारली, तर त्याचा आध्यात्मिक लाभ मूर्तीकाराला, तसेच ती पूजणार्‍यालाही होतो.

नंदुरबार येथे वाहत्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍यास नगरपरिषदेने बंदी घातल्‍याने गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांत अप्रसन्‍नता !

कोरोनाच्‍या आपत्‍काळातही सामाजिक नियमांचे काटेकोर पालन करून श्री गणेशमूर्तीविसर्जन वाहत्‍या पाण्‍यात कसे करू शकतो, हे प्रशासनाने पहायला हवे होते ! चांगले नियोजन केले असते, तर ठराविक भाविकांची मर्यादा घालून मूर्तीविसर्जन वाहत्‍या पाण्‍यात करणे अशक्‍य नव्‍हते !

भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा २० सप्टेंबर या दिवशी गोव्यात दौरा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे गोव्यासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस २० सप्टेंबर २०२१ या दिवशी गोव्यात येणार आहेत. भाजपमधील स्थानिक निवडक कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी पक्षाचे धोरण ठरवण्यात येईल.

हिंदूंच्या परिणामकारक संघटनाने लव्ह जिहादचा नायनाट होऊ शकतो ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

या कार्यक्रमाचा लाभ १ सहस्रांहून अधिक हिंदूंनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश कु. शबरी देशमुख यांनी सांगितला.