श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध, ही हिंदूंची गळचेपी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे. यासह काही ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणले आहेत, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ घंटा राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख मुंबईकरांकडून ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल !

मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख नागरिकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. 

विकासक योगेश देशमुख यांचा जामीन रहित करण्याची ‘ईडी’ने प्रविष्ट केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

विकासक योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात.

खासदार भावना गवळी अंमलबजावणी संचालनालयावर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत ! – हरीश सारडा, माजी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. जर माझी हत्या झाली, तर त्याला त्या उत्तरदायी असतील, असे ते पुढे म्हणाले.

श्री गणेशाप्रती भाव वाढवूया !

गणेशोत्सवाच्या कालावधीत करण्यात येणार्‍या विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र समजून घेऊन त्याला भावाची जोड दिल्यास श्री गणेशाची कृपा निश्चितपणे संपादन होईल आणि खर्‍या अर्थाने गणेशचतुर्थीचा उद्देश साध्य होईल.

नंदुरबार जिल्ह्यात उपचारांअभावी महिलेचा मृत्यू

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अशी स्थिती असणे, हे सर्वपक्षीय सरकारांना आणि प्रशासनाला लज्जास्पद !

नगर येथे पोलिसांच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा मुलाच्या आईचा आरोप !

येथील शेवगाव तालुक्यातील चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून आदित्य भोंगळे या तरुणास पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले होते.

शवदाहिनीतील ‘गॅस’ संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत ३ दिवस पडून

भाईंदर (पश्चिम) भागातील भोलानगर येथे मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्मशानभूमी आहे. या भागात ही एकमेव स्मशानभूमी असून येथे ‘गॅस’वरील शवदाहिनीत, तसेच लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी केले जातात.