मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख मुंबईकरांकडून ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल !

ही आहे सर्वपक्षीय शासनकर्त्यांची कारकीर्द ! जनतेला शिस्त न लावल्याचा गंभीर परिणाम ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख नागरिकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.  रस्त्यावर थुंकणार्‍या २७ लाख नागरिकांवर कारवाई करत ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०२० ते ७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.