रयत शिक्षण संस्थेच्या वतीने २ कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे सुपुर्द !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ घंटा राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या वेळी शरद पवार यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’च्या वतीने २ कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीत राज्यातील पूरपरिस्थिती, कोरोनाची परिस्थिती, विधान परिषदेतील १२ आमदारांचे सूत्र, ‘ओबीसी’ राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’)चे धाडसत्र, महाविकास आघाडीतील समन्वय, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून मिळालेली ‘क्लीन चीट’ या सूत्रांवर चर्चा झाली.