झारखंड विधानसभेमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली !
हिंदूंना पूजा करण्यासाठी अशी खोली भाजपशासित राज्यात सरकारकडून देण्यात आली असती, तर या तथाकथित निधर्मीवाद्यांनी राज्यघटनेच्या नावाखाली आकाशपाताळ एक केले असते !
जन्माष्टमीनिमित्त उपवास करणार्या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण
अशा शिक्षकाला निलंबित नाही, तर बडतर्फ आणि अटक करून कारागृहात टाकले पाहिजे; म्हणजे अन्य कुणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही !
श्रीकृष्ण जयंतीला हिंदु मैत्रिणीला मांस खाऊ घातल्याने मला शांती मिळायची ! – लेखिका चुगतई
धर्मांधांना लहानपणापासून हिंदुद्वेष शिकवला जातो. तेव्हापासून त्यांची मानसिकता हिंदुविरोधी बनते. यातून ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पना किती खुळी आहे आणि ती अंगीकारणारे हिंदू किती अज्ञानी आहेत, हे लक्षात येते !
किती प्रकरणांत आरोपींना शिक्षा देऊ शकलात ? – सर्वाेच्च न्यायालयाचा सीबीआयला प्रश्न
किती प्रकरणात अन्वेषण यंत्रणांनी निरपराध्यांना अटक करून त्यांचा छळ केला ?, याची माहितीही घेतली पाहिजे. तसेच असे करणार्या संबंधित अधिकार्यांना शिक्षा केली पाहिजे, असेही जनतेला वाटते !
निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या हिंदुद्वेषी अभद्र युतीचा वैध मार्गाने विरोध करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
ख्रिस्ती आणि जिहादी साम्राज्यवादी शक्तींना वैश्विक हिंदुत्वाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतातील राजकीय विचारांचे निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या साहाय्याने १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर…
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसह युवा पिढीला श्री गणेशाविषयी धर्मशास्त्र माहीत व्हावे, यासाठी श्री गणेशाविषयीचे २५ प्रश्न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे.
पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तथा सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या ८६ व्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन चैतन्यमय वातावरणामध्ये झाले.
भगवद्प्राप्ती कशी करावी ?, याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते ! – लक्कावल वेंकट गंगाधर शास्त्री, संस्थापक, भगवद्गीता फाऊंडेशन, भाग्यनगर
भगवद्भक्ती केल्याने मानव जन्माचे सार्थक होते, याविषयीचे मार्गदर्शन सनातन संस्था विविध माध्यमांतून समाजाला करत असते. सनातन संस्थेने नुकतीच तेलुगु भाषेतील ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’ची निर्मिती केली आहे.
‘यू ट्यूब’ वाहिनीच्या दिग्दर्शकाला मुंबईत अटक
मुंबई पोलिसांनी गौतम दत्ता (वय ४३ वर्षे) या ‘यू ट्यूब’ वाहिनीच्या दिग्दर्शकाला अटक केली आहे. त्याच्याकडे १ किलो गांजा सापडला असून त्याचे मूल्य ५० लाख रुपये आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी (अमली पदार्थ विरोधी पथक) दत्ता नलवडे यांनी दिली आहे.