केवळ गुन्हे नोंदवून थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे १ सप्टेंबरला निधन झाले. त्यांचा मृतदेह जम्मू-काश्मीर पोलिसांनी दफन केला. पोलिसांनी गिलानी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडून कह्यात घेतला. मृतदेह पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळला असल्याने आणि त्या वेळी भारतविरोधी घोषणा देण्यात आल्याने गिलानी यांचे कुटुंबीय आणि अन्य लोक यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.‘ गिलानी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात जमाव गोळा होऊन नंतर हिंसाचार भडकू शकतो, या कारणावरून त्यांचा मृतदेह पोलिसांनी कह्यात घेऊन दफन केला’, असे सांगण्यात येत आहे. गिलानी यांच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी भ्रमणभाष आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ४ सप्टेंबरला रात्री ही सेवा पूर्ववत् झाल्यानंतर गिलानी यांचा मृतदेह पोलिसांनी कह्यात घेतल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर ही माहिती उघड झाली.
Police has registered an FIR against the draping of the body of hardline separatist leader #SyedAliShahGeelani in a #Pakistani flag after his death on Wednesday, officials said.https://t.co/VzQYFFUAqf
— India TV (@indiatvnews) September 4, 2021
एका व्हिडीओमध्ये गिलानी यांच्या मृतदेहाभोवती मोठ्या प्रमाणात लोक जमल्याचे दिसत होते. गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळला होता. मृतदेह ठेवलेल्या खोलीत पोलीसही दिसत होते. या वेळी पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचेही दिसत आहे. (पोलिसांना धक्काबुक्की करण्याइतपत उद्दाम झालेले धर्मांध ! अशांना कारागृहात डांबा ! – संपादक) याविषयी जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी, ‘देशविरोधी कारवाया करणार्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत’, असे सांगितले.