पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताला प्रथमच १९ पदके !

टोकियो (जपान) – येथे चालू असलेल्या पॅरा ऑलिंपिकची (विकलांगांसाठीच्या ऑलिंपिकची) ५ सप्टेंबर या दिवशी सांगता झाली. यात भारतीय खेळाडूंनी ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य, अशी एकूण १९ पदके प्राप्त केली. या पदकांसह भारत २४ व्या क्रमांकावर होता. पॅरा ऑलिंपिकचा प्रारंभ वर्ष १९६० मध्ये झाला आणि भारत यात वर्ष १९६८ पासून सहभाग घेऊ लागला. मागील पॅरा ऑलिंपिकपर्यंत भारताने एकूण १२ पदकेच मिळवली होती. यावर्षी प्रथमच एकाच पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताने १९ पदके मिळवली. काही आठवड्यांपूर्वी येथेच झालेल्या ऑलिंपिकमध्येही भारताने प्रथमच सर्वाधिक ७ पदके मिळवली होती.