पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये आत्मघातकी आक्रमणात ३ जण ठार, तर २० जण घायाळ

‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने स्वीकारले दायित्व !

घटनास्थळ

क्वेट्टा (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टापासून अनुमाने २५ किलोमीटर दक्षिणेस क्वेट्टा-मस्तुंग रस्त्यावरील ‘पॅरामिलिट्री फ्रंटीयर कॉर्प्स’च्या एका चौकीवर झालेल्या आत्मघातकी आक्रमणामध्ये ३ जण ठार, तर २० जण गंभीररित्या घायाळ झाले. या आक्रमणाचे दायित्व ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने घेतले आहे. हे आत्मघाती आक्रमण घडवणारा आतंकवादी एका दुचाकीवरून आला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे.