अमेरिका, युनायटेड किंगडम, रशिया आदी १३ प्रमुख देशांच्या नेत्यांना टाकले मागे !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कॅनडा, अमेरिका, ब्राझिल, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. अमेरिकतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या आस्थापनाने हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना ७० टक्के गुणांकन मिळाले आहे. प्रत्येक आठवड्याला या सर्वेक्षणाची माहिती अद्ययावत केली जाते.
पीएम नरेंद्र मोदी ने एक बार फिर विश्व में अपनी छवि और मजबूत की है | #PMModi #PopularLeader https://t.co/O4TwBbVUFX
— AajTak (@aajtak) September 5, 2021
१. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी गेल्या आठवड्यात सर्वेक्षण केलेल्या १३ जागतिक नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. यावर्षीच्या जून मासामध्ये त्यांचे गुणांकन ६६ टक्क्यांवर आले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये मोदी यांचे गुणांकन तब्बल ८२ टक्क्यांवर होते; मात्र गेल्या २ वर्षांत त्यात घट झाल्याचे पहायला मिळाले.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रौढांमध्ये सर्वांत अल्प असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतात सर्वेक्षण केलेल्या प्रौढांपैकी २५ टक्के लोकांनी मोदी यांना नाकारले आहे.
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !