पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने चालू करण्यात यावा. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने चालू होईल, यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या.