अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याप्रकरणी उद्योजक राज कुंद्रा यांना अटक !

अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक केली आहे. १९ जुलैच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

नागपूर येथील ‘एस्.जे. एंटरप्रायजेस’कडून लोकांची फसवणूक !

फसवणूक करणार्‍यांकडून लुबाडलेला पैसा वसूल करून घ्यायला हवा !

कोरोनाच्या कडक निर्बंधांतही ठाणे येथे चालू असणार्‍या ३ डान्सबारचा परवाना रहित !

निर्बंध लागू असतांनाही डान्सबार चालू ठेवले जातात, यात पोलीसच अधिक दोषी आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे दोषी पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !

उत्तर महाराष्ट्र-मराठवाडा येथील धरण क्षेत्रांत पुरेसा पाऊस न पडल्याने चिंता वाढली !

जुलै संपत आला, तरी राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाणीटंचाईमुळे चिंता निर्माण झाली आहे. या वर्षी उत्तर महाराष्ट्रात पाऊस अल्प पडला आहे, तसेच पुणे विभागातील धरणांत पाणीसाठा अल्प आहे.

दहा वर्षांत राष्ट्र्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ सहस्र ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात !

बँकांनी उद्योजक आणि व्यावसायिक यांना अवाजवी कर्जवाटप केले. वसुलीसाठी दीर्घकाळपर्यंत सवलत दिली. खासगी बँकांप्रमाणे वसुली मोहीम राबवण्यास बँका अपयशी ठरल्या.

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त अनुमती दिलेल्या तात्पुरत्या पशूवधगृहांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती !

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त २१ ते २३ जुलै या कालावधीत तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती दिली होती. महानगरपालिकेच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गौ ज्ञान फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश !

पांढरकवडा (यवतमाळ) येथे मुलीला जन्म दिल्याने नणंदेने वहिनीला जिवंत जाळले !

नात्यांमधील संवेदनशीलता संपत चालल्याचेच हे लक्षण !

ईदनिमित्त नियमित १ सहस्र जनावरे कापण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली !

देवनार येथील पशूवधगृहामध्ये ईदनिमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत नियमित ३०० मोठी जनावरे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनुमती दिली आहे

देशहित मोठे कि राजकीय स्वार्थ ?

सरकारने जसा हेरगिरीवर चाप लावला पाहिजे, तसाच राजकीय स्वार्थासाठी संसदेचे कामकाज रोखून धरणार्‍यांवरही चाप लावला पाहिजे. हेही सरकारचे कर्तव्यच आहे.

हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दोन पत्रकार कह्यात !

‘क्राईम चेक टाईम’ या वेबपोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगून २ पत्रकारांनी हॉटेल मालकाला तुम्ही अवैधरीत्या मद्य विक्री करत आहात. तेव्हा हे प्रकरण मिटवण्यासाठी १ सहस्र रुपये देण्याची मागणी केली…..